www.24taas.com, झी मीडिया, पुणे
ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखक आनंद यादव यांची ती वादग्रस्त पुस्तके नष्ट कऱण्याचे आदेश येथील न्यायालयाने दिले आहेत. संतसूर्य तुकाराम आणि लोकसखा ज्ञानेश्वर या दोन्ही पुस्तकांच्या प्रती नष्ट करण्याचे न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
पुस्तके नष्ट करण्याबरोबरचर या पुस्तकाचे लेखक, प्रकाशक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. या दोन्ही पुस्तकातून संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांची बदनामी झाल्याचा आरोप तुकारामांचे वंशज जयसिंह मोरे यांनी केला होता. त्यांनी पुस्तकांबाबत न्यायालयात धाव घेतली होती.
मोरे यांनी या प्रकरणी 2009 मध्ये त्यांनी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांकडे दावाही दाखल केला होता. वादग्रस्त पुस्तकाबाबत आनंद यादव आणि प्रकाशक सुनील मेहता यांना पुस्तकातल्या मजकुराबाबत पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, याबाबत पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने पुस्तके नष्ट करण्याचा आदेश दिला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.