डेक्कन क्वीनचा 85 वा वाढदिवस साजरा

देशातील पहिली वहिली आरामदायी रेल्वे डेक्कन क्वीनचा 85 वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. दख्खन की राणी अशी ओळख असणारी ही गाडी मुंबई-पुणे या दोन शहरांच्या प्रगतीत महत्त्वाचा दुवा ठरली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 1, 2014, 06:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
देशातील पहिली वहिली आरामदायी रेल्वे डेक्कन क्वीनचा 85 वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. दख्खन की राणी अशी ओळख असणारी ही गाडी मुंबई-पुणे या दोन शहरांच्या प्रगतीत महत्त्वाचा दुवा ठरली आहे.
1 जून 1930 पासून आतापर्यंत अविरत धावणा-या या गाडीचा अनेकदा कायापालटही झाला. आयएसओ 9001-2000 प्रमाणपत्र मिळवणारी ही भारतातील केवळ दुसरी रेल्वे आहे.
सद्यस्थितीत 17 डब्यांसह आपला प्रवास करणा-या या डेक्कन क्वीनला 4 एसी चेअर कार, एक डायनिंग कार, 10 सेकंड क्लास चेअर कारसह दोन सेकंड क्लास कम ब्रेक वॅन जोडलेल्या आहेत.
1 जून 1930 ला पुणे – मुंबई दरम्यान पहिल्यांदा धावली. अतिशय वेळेत धावणारी ट्रेन म्हणून हिचा नावलौकिक आहे.
ट्रेनमध्ये रेस्टॉरंट असलेली ही भारतातील एकमेव ट्रेन आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.