www.24taas.com, बीड
बीडमधल्या विजयमाला पट्टेकर मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या डॉ. सरस्वती मुंडेंला सशर्त जामीन मंजूर झालाय. तीन लाखांच्या जातमचुलक्यावर अंबाजागोई सत्र न्यायालयानं सरस्वती मुंडेंला जामीन मंजूर केलाय.
प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत सरस्वती मुंडेला प्रॅक्टीस बंद ठेवण्याची सूचना न्यायालयानं केलीय. तसंच परळी पोलीस ठाण्यात एक दिवसाआड हजेरी लावण्याचे आदेशही कोर्टानं सरस्वती मुंडेला दिलेत. परळीतल्या डॉ. मुंडे यांच्या मुंडे हॉस्पीटलमध्ये १९ मे २०१२ ला विजयमाला पट्टेकर या महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात सस्वती मुंडे आणि तिचा पती सुदाम मुंडे हे दोघही आरोपी होते.
२०१० साली वर्षा देशपांडे यांनी केलेल्या स्टींग ऑपरेशन प्रकरणात डॉ. मुंडे दाम्पत्याला दिलेला जामीन न्यायालयानं रद्द केला होता. २०११ साली डॉ. मुंडे यांच्या शेतामध्ये मृत अर्भक नष्ट करण्याच्या उद्देशानं फेकलेली आढळली होती. या तीनही प्रकरणात त्याच्या विरोधात परळी ग्रामीण आणि परळी शहर पो. स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. यातल्या पट्टेकर या महिलेच्या मृत्यू प्रकरणात त्यांना जामीन मिळालाय.