www.24taas.com, झी मीडिया,कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हयातील आजरा तालुक्यात हत्तींचा कळप घुसलाय. पाच हत्तींच्या कळपानं अजरा शहराजवळील शेतीकडे आपला मोर्चा वळला आहे. या हत्तींनी ऊस, केळी आणि भातासारखी पिकं फस्त करायला सुरूवात केलीय. त्यामुळं या तालुक्यातील शेतकरी हवालदिल झालाय.
आजऱ्यातील म्हसोली इथले मारुती रामा कांबळे यांच्या शेतात चार दिवसांपुर्वी हत्तींचा कळप घुसला. ऊस, भात आणि केळीच्या पिकावर ताव मारत हत्तीनं शेताची नासधूस केली. त्यामुळं कांबळेंचं मोठं नुकसान झालंय. कांबळेंसाठी हा दरवर्षीचा या प्रकार आहे. त्यामुळे ह्या हत्तींवर कवीताच रचली.
मुबलक पाणी आणि खायला पुरेसं अन्न असल्यामुळे या हत्तींच्य कळपाने आजरा तालुक्यात मुक्काम ठोकलाय. या हत्तीच्या कळपाने अतापर्यत शेतांचील पिकांचा फडशा पाडलाय. वनविभागाकडून या नुकसानीची भरपाई मिळते. पण ती तुटपुंजी असल्यामुळे शेतकरी हैराण झालाय.
हत्ती शेतात येऊन पिकाचं नुकसान करातात या बद्दल शेतकऱ्याची फारशी तक्रार नाही, पण झालेल्या पिकाची नुकसान भरपाई योग्य मिळावी एवढीच या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. पण वनविभाग मागणीकडं लक्षच देत नसल्याने हत्ती आणि वनविभाग यांच्यात फरक काय राहिला, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करतायत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.