लोणावळा, खंडाळा खाली करा, एलपीजीची गळती

मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर गॅसगळती झालीये. गॅस वाहून नेणा-या हिंदुस्तान पेट्रोलियमच्या टँकरला भरधाव टेम्पो धडकला. त्यामुळं टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळतीला सुरुवात झाली.

Updated: Sep 6, 2012, 05:36 PM IST

www.24taas.com, लोणावळा
मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर गॅसगळती झालीये. गॅस वाहून नेणा-या हिंदुस्तान पेट्रोलियमच्या टँकरला भरधाव टेम्पो धडकला. त्यामुळं टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळतीला सुरुवात झाली.
गळतीचं प्रमाण बरंच जास्त असल्यामुळे आसपासच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन खंडाळा नगर पालिकेतर्फे करण्यात येतंय. तसंच शहरातल्या शाळांनाही सुटी देण्यात आलीय.
एक्स्प्रेस वेरीवल वाहतूक जुन्या मुंबई-पुणे हायवेवर वळवण्यात आलीय. टँकरमधील गॅसगळती रोखण्यासाठी आयआरबीचे तंत्रज्ञ घटनास्थळी दाखल झालेत.