www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
तिरुमला तिरुपती देवस्थानतर्फे देण्यात येणा-या लाडू प्रसादाच्या धर्तीवर कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांनाही लाडू प्रसाद देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महालक्ष्मीचा हा प्रसाद पोस्टानंही मागवण्याची सोय आहे.त्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केलंय.
काजू, बेदाणे,बदाम, खडी-साखर यांचा वापर करुन करण्यात आलेला हा लाडू तुम्ही तिरुपतीच्या मंदिरात अनेकदा खाल्ला असेल. पण हा लाडू तिरुपतीच्या मंदिरातला नसून कोल्हापूरातल्या महालक्ष्मी मंदिरातला आहे. महालक्ष्मी मंदिरात दिल्या जाणा-या लाडूच्या प्रसादावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.
या लाडूच्या दर्जाबद्दल आणि नियमिततेबद्दल भक्तांकडुन नाराजी सुरुच होती. त्यामुळं तिरुमाला तिरुपतीच्या धर्तीवर ना नफा ना तोटा तत्वावर लाडू देण्याचा निर्णय महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टनं घेतलाय.कोल्हापुरच्या महापौर प्रतिभा नाईकनवरे यांनी या उपक्रमाचं उद्घघाटन केलं.
महालक्ष्मीचा हा प्रसाद खाण्यासाठी तुम्हाला मंदिरात जाण्याची गरज नाही. भक्तांना पोस्टाने लाडू देण्याची व्यवस्थाही अन्नछत्र सेवा ट्रस्टनं सुरु केलीय.त्यामुळे महालक्ष्मीच्या भक्तांमध्ये सध्या आनंदाची भावना आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.