www.24taas.com, झी मीडिया, पुणे
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप मराठा संघटनांनी केलाय. मराठ्यांसह समाजातील सगळ्याच आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देण्याची भूमिका शरद पवार यांनी मांडली होती. ती मान्य नसल्याचं सांगत मराठ्यांना सरसकट आरक्षणाची मराठा संघटनांची मागणी आहे.
पुण्यात झालेल्या पदाधिका-यांच्या बैठकीत शरद पवारांनी सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची गरज व्यक्त केली. दलित, ओबीसी तसेच आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता इतर सर्व आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षणाचा लाभ मिळावा असं पवारांचं म्हणणं आहे. मराठा संघटनांना मात्र ही भूमिका मान्य नाही. आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण ही गोष्ट शक्य नाही.
त्यामुळे मराठा समाजाला सामाजिक न्यायाच्या आधारावर आरक्षण मिळायला पाहिजे. यासंदर्भात शरद पवार मराठ्यांसह सगळ्यांचीच दिशाभूल करत असल्याचा आरोप
मराठा संघटनांनी केलाय.
शरद पवार आणि मराठा संघटनांनी घेतलेल्या या परस्परविरोधी भूमिकांमुळे राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वादळ निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
हा वाद काहींसाठी घातक तर काहींसाठी लाभाचा ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने याचा अनुभव गेल्या निवडणुकीत घेतला होता. आता २०१४ ची निवडणूक तोंडावर आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.