कोल्हापूर सिरीयल किलरचा छडा लावणार मुंबई पोलीस

कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या खून सत्राचा छडा लावण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचची टीम उद्या कोल्हापुरात दाखल होणार आहे. त्यामुळं ही टीम आता शोध लावणार का, याची उत्सुकता आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 19, 2013, 08:44 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या खून सत्राचा छडा लावण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचची टीम उद्या कोल्हापुरात दाखल होणार आहे. त्यामुळं ही टीम आता शोध लावणार का, याची उत्सुकता आहे.
कोल्हापूर पोलिसांना गुन्हेगाराचा शोध लावण्यात अपयश आल्यामुळं थेट मुंबई क्राईम ब्रांचच्या हातात तपासाची सूत्र देण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिलीय.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात हत्यांचं सत्र सुरु आहे. आज पुन्हा इथल्या रिलायन्स मॉलजवळ एका महिलेचा मृतदेह आढळला. दगडानं ठेचून तिची हत्या करण्यात आलीय. गेल्या 3 महिन्यांतली अशाप्रकारची ही १० वी घटना आहे. त्यामुळं कोल्हापूरकरांमध्ये भितीचं वातावरण आहे.

मंगळवारी टाऊन हॉल खून प्रकरणाचं गूढ उकलण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आलं होतं. या घटना एकसारख्या असल्यानं त्यामागं सिरीयल किलरचा हात असण्याची शक्यता वर्तवली जातेय.
मात्र या सिरीयल किलरला जेरबंद करण्यात पोलीस अपयशी ठरलेत. त्यामुळं त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कोल्हापुरकरांनी संताप व्यक्त केलाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.