www.24taas.com, झी मीडिया, बारामती
केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या बारामतीत २२ गावांनी पाण्यासाठी आंदोलन केल्यानंतर आता बारामती तालुक्यातील तमाम जनता आंदोलनाच्या पवित्र्यात दिसून येतेय. बारामती तालुक्यातील शिर्सुफळमध्ये दारूबंदीसाठी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य, ग्रामस्थ नवीन वर्षाच्या स्वागतालाच उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण बारामतीचं याकडे लक्ष लागलं आहे.
बारामतीतील शिर्सुफळ गावच्या हद्दीत सुरु आसलेल्या बिअर शॉपी सह सर्व प्रकारचा दारूचा व्यवसाय बंद व्हावा आशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदनही दिलंय. शिवाय अनेकदा उपमुख्य मंत्री अजित दादा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे लेखी तक्रारी करूनही देखील गेल्या पाच वर्षापासून यावर त्यांनी दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा ग्रामपंचायतिचे सरपंच, उप सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी दिला आहे.
१५ ऑगस्ट २०१३ ला झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते दारूबंदीचा ठराव करून तो जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला. ला पण त्यावर अजून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अनेक वर्षापासून सुरु आसलेल्या या धंद्यामुळे गावातील अनेकांची संसारं उद्ध्वस्त झालेली आहेत.
या संदर्भात उत्पादन शुक्ल विभागाच्या अधिकार्यांना या बाबत विचारपूस केली आसता त्यांनी रजेचं कारण दाखवत कमेरा पुढे येण्याचं टाळलं. एकीकडे पाण्यासाठी भांडणारा जन्भोक्ष उसळत असून, दुसरीकडे मात्र दारूचा महापूर रोखण्यासाठी गाव कारभारी रस्त्यावर उतरु लागल्यानं बारामतीत पवारांची ही मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.