www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यामध्ये फेसबुक प्रकरणातून एकाचा खून झाल्यानंतर या प्रकरणाचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयानं राज्याकडून मागवलाय. पुण्याचे पोलीस आयुक्त सतीश माथूर यांनी गुरुवारी, प्रशासन महाराष्ट्रात धोकादायक हालचाली प्रतिबंध अधिनियम (एमपीडीए) सारखे कठोर नियम लावण्यावर विचार करत असल्याचं म्हटलंय. त्यामुळे, याप्रकारच्या प्रकरणांतील आरोपींना जामीन मिळवणंही कठिण होऊन जाईल. दरम्यान, पुण्यात फेसबुक प्रकरणाचे हिंसक पडसाद उमटलेत. हडपसर भागामध्ये मोहसीन या आयटी प्रोफेशनलची हत्या करण्यात आली. याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या १७ जणांना अटक करण्यात आलीय.
शनिवार ते सोमवार असे तीन दिवस पुण्यात समाजकंटकांचं अक्षरष: थैमान सुरु होतं. पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील इतर भागांमध्येही दगडफेक, जाळपोळ, रास्तारोको, दुकानं आणि वाहनांवरचे हल्ले यांचं सत्र सुरु होतं. पोलीस परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगत होते. मात्र, प्रत्यनक्षात परिस्थिती वेगळी होती. हिंसक घटनांवर कोणाचंही नियंत्रण न राहिल्यााने परिस्थिती आणखी चिघळत गेली आणि हिंदू राष्ट्रर सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मोहसिन शेख या मुस्लीम युवकाची हत्या करण्यात आली.
हडपसरला मोहसिन शेख ज्या ठिकाणी रहात होता त्या ठिकाणीही बंदोबस्त होता, असं पोलिसांचं म्हसणं आहे. मग तरीही मोहसिन शेखची हत्या कशी झाली असा? प्रश्नं विचारला जातोय.
सोशल मीडियाचा वापर अफवा पसरवण्यासाठी करू नका!
गेल्या चार दिवसांत सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाला. सोशल मीडियावरुन अफवा पसरण्याचा वेगही प्रचंड होता आणि या सगळ्या घडामोडींमध्ये एका निष्पाप तरुणाचा बळी गेलाय. तरुणांचं टोळकं एकाचा भर रस्त्यात खून करतं, त्यामुळे पोलिसांचा धाकही उरलेला नाही, हे स्पष्ट होतंय आणि या सगळ्यावर नियंत्रण कोण ठेवणार, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे.
नेते कुठे गेले?
फेसबुकवर महापुरुषांची बदनामी करण्याणत आल्याळनंतर पुण्यातत सलग तीन दिवस समाजकंटकांनी थैमान घातलं. या तीन दिवसांमधे पुणे शहर आणि जिल्या्य च्याव इतर भागातही हिंसक घटनांचं सत्र सुरु होतं. मात्र, या तीन दिवसांमध्ये शांततेसाठी आवाहन करण्यातसाठी आणि लोकांना धीर देण्यांसाठी कोणत्यातच पक्षाचा कुठलाच नेता पुढे आला नाही.
आईची भाबडी आशा...
पुण्यात फेसबूक प्रकरणात मारहाणीत मृत्यू झालेल्या मोहसीन शेख या तरूणाच्या सोलापूरच्या घरात शोकाकूल वातावरण आहे. त्याचे आईवडिल अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. अजूनही आपला मुलगा घरी येईल अशी भाबडी आशा त्याच्या आईला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.