राज ठाकरे आज सांगलीत संवाद साधणार

महाराष्ट्राच्या दौ-यावर निघालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सांगलीतल्या पदाधिका-यांशी संवाद साधणार आहेत. राज ठाकरे कालच सांगलीत दाखल झालेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 11, 2013, 01:09 PM IST

www.24taas.com,सांगली
महाराष्ट्राच्या दौ-यावर निघालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सांगलीतल्या पदाधिका-यांशी संवाद साधणार आहेत. राज ठाकरे कालच सांगलीत दाखल झालेत.
मनसे पदाधिका-यांसोबत त्यांची बैठक असणार आहे. या बैठकीत ते मनसे पदाधिका-यांच्या अडचणीही जाणून घेणार असल्याचं समजतं. उद्या कोल्हापुरात राज ठाकरे मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यासाठी जवळपास १०हजार मनसैनिक सांगलीतून जाणार आहेत. सांगली जिल्ह्यातल्या दहा तालुक्यांपैकी आठ तालुक्यात दुष्काळी स्थिती आहे.

दुष्काळी भागात मिरज पूर्व भाग, तासगाव, कवठे महांकाळ, जत, आटपाडी खानापूर या तालुक्यांचा समावेश आहे. यातल्या आटपाडी आणि खानापूरमध्ये भीषण परिस्थिती आहे. राज या दुष्काळी परिस्थितीवर काय भाष्य करणार याकडं लक्ष लागलयं.