राज ठाकरेंना जामीन मंजूर

सांगली जिल्ह्यातल्या शिराळा न्यायालयानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना १५ हजारांचा जामीन मंजूर केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 1, 2013, 03:46 PM IST

www.24taas.com, सांगली
सांगली जिल्ह्यातल्या शिराळा न्यायालयानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना १५ हजारांचा जामीन मंजूर केलाय. २००८ मध्ये कल्याणमधल्या प्रक्षोभक भाषणामुळे राज ठाकरेंना रत्नागिरीत अटक झाली होती. याचा निषेध करत तालुक्यातल्या मनसे कार्य़कर्त्यांनी तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे, शिरीष पारकर, तानाजी सावंत, यांच्यासह काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी आज शिराळा न्यायालयात झाली. राज ठाकरे सकाळीच हेलिकॉप्टरनं शिराळ्यात दाखल झाले.

२००८ मध्ये कल्याणमधील प्रक्षोभक भाषणामुळे राज ठाकरेंना रत्नागिरीत अटक करण्यात आली होती. त्यानंतर शिराळा तालुक्यातील मनसे कार्य़कर्त्यांनी आंदोलन करून तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे, शिरीष पारकर, तानाजी सावंत, यांच्यासह इतर कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करण्याकत आले होते. या खटल्यात राज ठाकरे आणि शिरिष पारकर यांच्या व्यतिरिक्त इतरांना आधीच जामीन मिळाला आहे.