www.24taas.com, झी मीडिया, सासवड
८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण सु्प्रसिद्ध चित्रपट अभिनेता रजनीकांत ऊर्फ शिवाजीराव गायकवाड यांना पाठविण्यात आलंय.
मूळचे पुरंदर तालुक्यातील मावडी क. प. या गावचे असलेले रजनीकांत यांना माजी सरपंच हनुमंत चाचर, स्वागताध्यक्ष विजय कोलते, निमंत्रक रावसाहेब पवार यांची स्वाक्षरी असलेलं निमंत्रण पाठविण्यात आलंय, अशी माहिती संमेलनाचे राज्य प्रसिद्धी समितीचे अध्यक्ष दशरथ यादव यांनी दिली.
दाक्षिणात्य चित्रपटातून साकारलेल्या भूमिकांमुळं रसिकांच्या गळ्यातला ताईत बनलेला रजनीकांत मूळचे पुरंदरचे आहेत. याचा पुरंदरवासियांना स्वाभिमान वाटतो. मूळगावाला येण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखविल्याचे ग्रामस्थ सांगतात. दोन पिढयांपूर्वी गायकवाड कुटुंब कोल्हापूरला गेलं होतं.
आता साहित्य संमेलनाचं हे निमंत्रण रजनीकांत स्वीकारतात का आणि ते कार्यक्रमाला हजर राहतात का? हे पाहणं औत्युक्याचं ठरेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ