www.zee24taas.com, झी मीडिया, सासवड
आपल्याला शाळा आणि कॉलेजात गणित कधी जमलं नाही, मात्र राजकारणात मला गणित जमतं, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सासवडच्या साहित्य संमेलनात बोलतांना सांगितलं.
शरद पवार हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ मु शिंदे यांच्याविषयी बोलत होते, तेव्हा पवारांनी आपल्या राजकीय गणितं जमतात, मात्र शाळेतलं गणित जमलं नसल्याचं सांगितलं.
फ मु शिंदे यांच्याविषयी बोलतांना पवार म्हणाले, फ मु शिंदे यांना गणित हा विषय आवडायचा, गणित आणि साहित्य एकाच वेळी कसं जमतं?, हे काही मला समजत नाही, कारण मला गणित कधी जमलं नाही, शाळा कॉलेजात कधी जमलं नाही, पण राजकारणात जमतं असं पवारांनी नकळत स्पष्ट केलं.
साहित्य संमेलनाचं उद्घाटन
फ मु शिंदे यांची मराठी आणि इंग्रजीची आवड समजू शकतो, भाषेत महत्वाचं व्याकरण त्यांच्यासाठी तळहाताचा मळ, तर भाषांतरावर कमालीचं प्रभुत्व फ मु शिंदे यांचं आहे, असंही यावेळी पवारांनी सांगितलं.
दरम्यान आज 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं. सासवडमध्ये कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं. यावेळी मावळते अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांच्याकडून संमेलनाची सूत्रं नवे अध्यक्ष कवी फ.मु.शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली.
सासवडेमध्ये 3, 4 आणि 5 जानेवारी असे तीन दिवससाहित्यिकांची गर्दी असणार आहे. त्यामुळं सासवडला साहित्य नगरीचं आलं आहे. रात्री 8 वाजता कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.