नेत्यांनो हिशोब करा – शरद पवार

राज्यात सध्या पाण्याची स्थिती गंभीर आहे. पाण्याच्या वापराचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांत राज्यातील सिंचन क्षेत्रात सात टक्क्यांची वाढ झाली आहे. विरोधी पक्षांकडून जलसंपदा खात्याला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत आहे. एखादे काम चुकीचे झाले असेल. त्याला जबाबदार कोण आहे? त्याची चौकशी करा, जो चुकीचा असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. पक्षातील नेत्यांनी कामाबरोबरच पाण्याचा हिशोब केला पाहिजे, अशी सूचना शरद पवार यांनी केली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 20, 2012, 08:19 PM IST

www.24taas.com,पुणे
राज्यात सध्या पाण्याची स्थिती गंभीर आहे. पाण्याच्या वापराचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांत राज्यातील सिंचन क्षेत्रात सात टक्क्यांची वाढ झाली आहे. विरोधी पक्षांकडून जलसंपदा खात्याला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत आहे. एखादे काम चुकीचे झाले असेल. त्याला जबाबदार कोण आहे? त्याची चौकशी करा, जो चुकीचा असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. पक्षातील नेत्यांनी कामाबरोबरच पाण्याचा हिशोब केला पाहिजे, अशी सूचना शरद पवार यांनी केली.
पुण्याजवळील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीमध्ये आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनाचे उदघाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, विकास करताना टीका होतच असते. या टीकेकडे लक्ष देण्याची गरज नाही. कार्यकर्त्यांनी विकासावर आधारित राजकारण करावे. एखादे काम चुकीचे झाले असेल. त्याला जबाबदार कोण आहे? त्याची चौकशी करा, जो चुकीचा असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. मात्र, एकाद्याला जबाबदार धरणे योग्य नाही, असे सांगत अजित पवार यांनी पाठराखण पवार यांनी केली.
लवासा प्रकल्पाची आखणी सुनियोजित पद्धतीने करण्यात आली आहे. प्रकल्पामुळे या भागातील पडीक जमिनीचा योग्य वापर झाला असून, अनेकांना रोजगारही मिळाला आहे. लवासामुळे कोणाचे भले झाले? राज्याचेच ना, कोणाच्या खिशात पैसे जातात का? लवासामुळे माझ्यावर टीका होत आहे. मात्र, विकास झाला हे नाकारून चालेल का, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला.