पित्यानेच केला तीन मुलींवर बलात्कार

सोलापुरातल्या कुंभारी परिसरातल्या बिडी घरकूल भागात पित्यानेच आपल्या तीन मुलींवर बलात्कार केलाय. या तीनपैकी दोन मुली या अल्पवयीन आहेत. या प्रकारानंतर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 14, 2013, 10:10 AM IST

www.24taas.com, सोलापूर

सोलापुरातल्या कुंभारी परिसरातल्या बिडी घरकूल भागात पित्यानेच आपल्या तीन मुलींवर बलात्कार केलाय. या तीनपैकी दोन मुली या अल्पवयीन आहेत. या प्रकारानंतर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांनी आरोपी पित्याला गजाआड केलंय. तर आईनंही बलात्कार केल्याचं समजून प्रतिकार न केल्यानं पोलिसांनी तिलाही अटक केलीय. या पीडित मुलींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

दरम्यान, या आधी नाशिकमध्ये एका नराधम पित्यानं आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय. गेल्या चार महिन्यांपासून पीडित मुलगी आपल्या पित्याच्याच अत्याचाराला बळी पडली. अत्याच्यारात वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.