जुन्नरमध्ये RTI कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू

जुन्नरमध्ये एका आरटीआय कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू झालाय. विलास बारावकर असं आरटीआय कार्यकर्त्याचं नाव आहे. ते चाकणमधील रहिवासी होते. चाकणच्या राजगुरू परिसरातल्या सहकारी संस्थांचे घोटाळे त्यांनी उघडकीस आणले होते. मात्र ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत अस्पष्टता आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 25, 2014, 12:44 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड
जुन्नरमध्ये एका आरटीआय कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू झालाय. विलास बारावकर असं आरटीआय कार्यकर्त्याचं नाव आहे. ते चाकणमधील रहिवासी होते. चाकणच्या राजगुरू परिसरातल्या सहकारी संस्थांचे घोटाळे त्यांनी उघडकीस आणले होते. मात्र ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत अस्पष्टता आहे.
आपल्या राहत्या घरी गळफास लावलेल्या स्थितीत विलास बारावकर यांचा मृतदेह आढळला. मात्र बारावकर यांनी आत्महत्येपूर्वी स्टॅम्प पेपरवर सुसाईड नोट लिहिली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या चार पानी सुसाईड नोटमध्ये त्यांनी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे- पाटील यांच्यासह ५२ जाणांची नावं लिहिली आहेत. या सर्वांचा उल्लेख घोटाळेबाज असा केला आहे.
बारावकर हे अनधिकृत बांधकामांविरोधात काम करत होते. सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.