इअर एंडला मिळणार शिळं मटण

३१ डिसेंबरच्या पार्श्वभुमीवर कोल्हापूरच्या खवय्ये नागरीकांना चिंतेत टाकणारी एक बातमी....कोल्हापूर महानगरपालीकेनं आधुनिक कत्तलखाना बी.ओ.टी तत्वावर उभारण्याच निर्णय घेतलाय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Dec 28, 2013, 12:06 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
३१ डिसेंबरच्या पार्श्वभुमीवर कोल्हापूरच्या खवय्ये नागरीकांना चिंतेत टाकणारी एक बातमी....कोल्हापूर महानगरपालीकेनं आधुनिक कत्तलखाना बी.ओ.टी तत्वावर उभारण्याच निर्णय घेतलाय. या निर्णयाच्याविरोधात खाटिक समाजानं विरोध दर्शवत २८ डिसेंबर ते १ जानेवारी पर्यत कोल्हापूर शहरातील मटण दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. एकीकडं कोल्हापूरकर नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी करतायत,पण दुसरीकडं खाटीक समाजानं पुकारलेल्या मटण दुकान बंद आंदोलनामुळं मटन खवय्ये कोल्हापूरकरांच्यातून नाराजी व्यक्त होतीय.

कोल्हापूर म्हटल की आपल्या डोळ्यासमोर येतो तांबडा-पाढंरा रस्सा..चटपटीत मटण..कोल्हापूरला येणारा प्रत्येक पर्यटक या ताबंड्या पाढं-या रस्स्यांची चव चाखल्याशिवाय जात नाही...कोल्हापूरकराचं मटणावर असणा-या प्रेमामुळं दररोज हजारो किलो मटणाची विक्री होते....त्यात 31 डिसेंबरची पार्टी करताना त्या पार्टीत मटण नाही असं होणारच नाही...पण आता कोल्हापूरकरांना मटनाशिवाय पार्टी करावी लागण्याची शक्यता आहे...
कोल्हापूर महानगरपालीकेच्यावतीनं शहरात बी.ओ.टी तत्वावरील कत्तलखाना उभारण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आलाय.या निर्णयाला विरोध करण्यासाठी खाटिक समाजानं 28 डिसेंबर ते 1 जानेवारी पर्यत मटण दुकान बंद ठेवण्याचं शस्र उगारलय...एकीकडं खाटिक समाज आडचणीत असतानाही कोल्हापूर महानगरपालीकेनं कत्तलखाना फी 25 रुपये केली आहे. त्यात आता बी.ओ.टीवर कत्तलखाना उभारल्यास ती फी कितीतरी पटीनं वाढण्याची शक्यता आहे..त्यामुळं आम्हाला
आंदोलनाशिवाय पर्याय नाही असं मटण विक्रेत्याचं म्हणण आहे.
मटण विक्रेत्यांच्या मागण्या जरी रास्त आसल्या तरी 31 डिसेंबरच्या तोंडावर मटण दुकान बंद करण्याचा घेतलेला निर्णय मटण खवय्ये कोल्हापूरकरांच्या जिव्हारी लागणारा आहे. त्यामुळं खाटीक समाजानं कोल्हापूर महानगरपालीकेच्या प्रशासनाशी बोलुन आपल्या मागण्या मान्य करुन घ्यावेत.पण मटण दुकान बंद करु नये असं कोल्हापूरकराचं म्हणण आहे.
या प्रकरणात कोल्हापूर महानगरपालीका प्रशासनान तात्काळ लक्ष घालुन खाटीक समाजाच्या मागण्याबाबात विचार करण्याची गरज आहे..नाही तर 31 डिसेंबरची पार्टी आणि नववर्षाचं स्वागत कोल्हापूरकरांना मटणाशिवाय करावी लागणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.