www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रेकॉर्ड तुटणार का? असाच प्रश्न साऱ्यांना पडला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घोषणा आज करण्यात आली मात्र आदित्य ठाकरे यांना कोणते पद दिले जाणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून होते. मात्र याविषयाबाबत काहीही माहिती देण्यात न आल्याने सध्यातरी आदित्य ठाकरे हे युवासेनेचेच काम पाहणार असल्याचे समजते.
मात्र आदित्य ठाकरे यांना जर नेतेपद मिळाले असते तर मात्र राज ठाकरे यांचा रेकॉर्ड नक्कीच मोडला असता. कारण वयाच्या २३व्या वर्षीच त्यांना पद मिळाले असता सेनेतेली सर्वाधिक तरूण नेता म्हणून त्यांची ओळख झाली असती. मात्र आता सध्यातरी कोणतेच पद आदित्य ठाकरेंना न दिल्यामुळे राज ठाकरेंचा रेकॉर्ड अजूनही अबाधितच राहिलेला आहे.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंची शिवसेनेच्या नेतेपदी निवड होणार असल्याची जोरदार चर्चा होती. आदित्य ठाकरेंची जर नेतेपदी निवड झाली असती तर ते आपले काका आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सर्वात तरूण वयात शिवसेना नेता होण्याचा विक्रम मोडीत निघाला असता. राज ठाकरे यांची वयाच्या २९व्या वर्षी शिवेसेना नेतेपदी निव़ड झाली होती.
मात्र या दोन्ही काका-पुतण्यांमध्ये एक लक्षवेधी असा राजकीय योगायोग आहे. राज ठाकरेंची १९८९ साली वयाच्या २१ व्या वर्षी भारतीय विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. तर आदित्य ठाकरेंचीही २०१० मध्ये वयाच्या २१ व्या वर्षीच युवासेनेच्या अध्यक्षपदी निवड झाली.