www.24taas.com, नाशिक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील पहिल्याच कोल्हापूरच्या सभेत त्यांनी प. महाराष्ट्रातील नेत्यावर टीका केली होती. त्यात ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका करतानाच त्यांनी त्यांची नक्कल केली होती. त्यालाच जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना त्यांच्या बालेकिल्ल्यात नाशिकमध्ये टीका केली.
‘ राज ठाकरे हे राष्ट्रवादीवर बोलतात, याचे विश्लेषण मी सांगितले, की राज ठाकरे दुसऱ्या कोणावर बोलत नाही, तर लोकं बघायला पाहिजे की नाही टीव्हीकडे.. बोलणारं हुशार असतात लोकं काही, राज ठाकरे का राष्ट्रवादीवर बोलतात?’
‘मी उत्तर देण्यासाठी या व्यासपीठाचा वापर करत नाही, आपल्याला नम्रपणे सांगतो, पद्धतीवर सांगतो मी.... तर आज महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा बलस्थानी असा पक्ष आहे, ही भावना पसरल्यामुळे त्यांना ठोकल्याशिवाय आपलं भाषण हे दाखवणारं नाही.’
‘दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर किंवा किरकोळ माणसावर बोललं तर प्रसारमाध्यमं त्याला कव्हरेज देत नाही. आणि टोकाची भाषा वापरल्याशिवाय... शेवटी संध्याकाळी दमून भागून घरी आल्यावर जेवताना, चहा पिताना... बायकोच्या शेजारी बसून चहा तिच्या हातचा घेताना काही तरी एन्टरटेनमेंट पाहिजे की नाही.’
‘ही एन्टरटेनमेंट संध्याकाळची जो देतो त्याला जास्त वेळ दाखवतात. आणि जे सरळ समाजसुधारणेच्या कामाबद्दल जे बोलतात त्यांच्यावर टीका होते. टीका करणं फार सोपं आहे मात्र सोल्यूशन देणं फार कठीण आहे.’ अशाप्रकारे जयंत पाटीलांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. राज ठाकरे यांना त्यांनी शालजोडीतून हाणले असल्याचेही त्यांच्या या भाषणातून दिसून आले. आता राज ठाकरे त्यांच्या ह्या टीकेला ठाकरी शैलीतून कसे उत्तर देणार याकडेच आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.