सचिनचा नवा रेकॉर्ड, ३४ हजाराला गवसणी

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं 34 हजार रन्स पूर्ण केले आहेत.

Updated: Dec 5, 2012, 04:50 PM IST

www.24taas.com, कोलकाता|>
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं 34 हजार रन्स पूर्ण केले आहेत. सचिनचे वन-डेमध्ये 18 हजार 426 रन्स आहेत. तर टेस्टमध्ये त्याचे 15 हजार 564 रन्स झाले आहेत. तर टी-20 मध्ये सचिनने 10 रन्स केले आहेत.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं कोलकाता टेस्टमध्ये ७६ रनची झुंजार खेळी खेळत त्याच्या टीकाकारांना चोख उत्तर दिलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये सचिन अपयशी ठरत असल्यानं त्याच्यावर बरीच टीका होत होती.
मात्र सचिनने ईडन गार्डनवर खंबीरपणे बॅटिंग केली. तब्बल 10 इनिंग्सनंतर सचिनच्या हाफ सेंच्युरी झळकावली आहे. सचिननं आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 34 हजार रन्सचा टप्पाही पार केलाय...