बीग बॉस : कुशालची घरात पुन्हा एन्ट्री?

‘बीग बॉस – सीझन ७’ आता चांगलाच रंगात आलाय. या कार्यक्रमाचा मसाला म्हणजेच रोमान्स... ‘बीग बॉस’च्या घरात सध्या उपस्थित असलेली एक जोडी म्हणजे अरमान-तनिषा... आणि दुसरी जोडी होती गौहर-कुशाल... पण...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 20, 2013, 04:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘बीग बॉस – सीझन ७’ आता चांगलाच रंगात आलाय. या कार्यक्रमाचा मसाला म्हणजेच रोमान्स... ‘बीग बॉस’च्या घरात सध्या उपस्थित असलेली एक जोडी म्हणजे अरमान-तनिषा... आणि दुसरी जोडी होती गौहर-कुशाल... पण, कुशाल अचानक घरातून बाहेर पडल्यानं या जोडीची ताटातूट झाली होती. पण, आता या दुसऱ्या जोडीचाही रोमान्स प्रेक्षकांना याच घरात पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झालीय.
सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित सुरू राहिल्या तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी कुशाल टंडनची ‘बीग बॉस’च्या घरात पुन्हा एन्ट्री होऊ शकते.
यामुळे कुशालचे फॅन्स मात्र नक्कीच खूश होणार आहेत. सलमान खान तनिषाला इतरांपेक्षा झुकतं माप दिलं आणि त्यामुळेच कुशाल बीग बॉसच्या घरातून बाहेर पडला, असं कुशालच्या अनेक फॅन्सना अजूनही वाटतंय. तसं त्यांनी सलमानला ट्विटरवरही सांगितलंय. त्यांना अजूनही कुशालला पुन्हा या घरात पाहायची इच्छा आहे.
कुशालच्या या चाहत्यांमध्ये बीग बॉसमध्ये सध्या घरात उपस्थित असलेली गौहर खानचाही समावेश आहे. ती तर कुशालच्या परतण्याकडे डोळे लावून बसलीय. ती तर आनंदानं वेडीच होईल. कुशालला पाठिशी घालताना तीनं शोचा होस्ट सलमान खानशीही पंगा घेतला होता. तनिषासोबत वाकडं वागणाऱ्या आणि घरात मारामारी करणाऱ्या कुशालवर सलमाननं टीका केली, तेव्हा ती गौहरला सहन झाली नव्हती.
तनिषा केवळ बॉलिवूडमधल्या एका मोठ्या घरातून आलीय म्हणून सलमान तिला पाठिशी घालतो, असं अनेकांना अजूनही वाटतं. पण, सलमाननं मात्र या सगळ्या आरोपांना फेटाळून लावतं, आपण केवळ एका महिलेच्या सन्मानाचा प्रयत्न केल्याचं ट्विटरवर स्पष्टीकरण दिलं होतं.
... आणि घरातून बाहेर पडल्यानंतर सलमानशी पंगा घेतलेला कुशाल पुन्हा एकदा याच घरात परण्याची चिन्हं निर्माण झालीत. यावर सलमान काय प्रतिक्रिया व्यक्त करणार याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.