विपुल मेहता `इंडियन आयडॉल-६` चा विजेता

गायक विपुल मेहता हा प्रसिद्ध टीव्ही रिऍलिटी शो ‘इंडियन आयडॉल’च्या सहाव्या पर्वाचा विजेता ठरला. विपुलला ५० लाख रुपयांचं बक्षिस तसंच एक निस्सान मायक्रा कार आणि एक सुझुकी हयाते मोटरसायकलही मिळाली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 2, 2012, 09:18 AM IST

www.24taas.com, मुंबई
गायक विपुल मेहता हा प्रसिद्ध टीव्ही रिऍलिटी शो ‘इंडियन आयडॉल’च्या सहाव्या पर्वाचा विजेता ठरला. विपुलला ५० लाख रुपयांचं बक्षिस तसंच एक निस्सान मायक्रा कार आणि एक सुझुकी हयाते मोटरसायकलही मिळाली.
विपुल आठ वर्षांचा असल्यापासून शास्त्रीय संगीत शिकत आहे. मास कम्युनिकेशन या विषयात त्याने ग्रॅज्युएशन केलं आहे. विपुलला साऊंड इंजिनियरींगमध्ये करीअर करण्याची इच्छा आहे.
इंडियन आयॉलच्या सहाव्या पर्वात टॉप ३ मध्ये विपुल मेहतासोबत देवेंदर पाल सिंग आणि अमित कुमारही फायनलमध्ये पोहोचले होते. विशेष म्हणजे तिन्ही गायक अमृतसरचेच होते. आशा भोसले, अनु मलिक, सुनिधी चौहान, सलीम मर्चंट यांनी या कार्यक्रमाचं परीक्षण केलं. निकालाच्या वेळी करीना कपूर आणि मधुर भंडारकरही उपस्थित होते.