हरारे: भारत आणि झिम्बाब्वेमध्ये यांच्यामध्ये आज पहिली टी-२० मॅच खेळवण्यात येणार आहे. वन-डे सीरिजमध्ये यजमान झिम्बाब्वेचा सुपडा साफ केल्यानंतर आता अजिंक्य रहाणेची टीम टी-२० मध्येही बाजी मारण्यास सज्ज आहे.
बॅट्समन या मॅचमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तीन वन-डे मॅचेसच्या सीरिजमध्ये भारतीय युवा टीम झिम्बाब्वेच्या टीमपेक्षा सरस ठरली होती. आता पहिल्या टी-२० मॅचमध्येही रहाणे अँड कंपनी झिम्बाब्वेच्या टीमला पराभवाची चव चाखण्यास आतूर असेल.
वन डे सीरिजमध्ये आघाडीच्या बॅट्समनना रन्स काढणं कठीण गेल्यानं सुरुवात मंद झाली होती. टी-२० सामन्यात मात्र एक बॉल देखील सामन्याचं चित्र बदलू शकतो. काही वेळा नकारात्मक कामगिरी संघाच्या अंगलट येते. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी सातत्यपूर्ण मारा करीत भारतीय फलंदाजांना मोकळे फटके मारण्याची परवानगी दिली नव्हती.
कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि मुरली विजय यांच्यासाठी जलद सुरुवात करणं हे आव्हान असेल. सिनियर फलंदाज रॉबिन उथप्पा वन-डेत प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरला होता. जखमी अंबाती रायुडूऐवजी संघात आलेला संजू सॅमसन याला उद्या खेळण्याची संधी मिळू शकते. भारताच्या गोलंदाजांनी मात्र चांगला मारा केला. टी-२० मध्ये गोलंदाजीतील भेदकता कमी होणार नाही, अशी आशा करूया.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.