भारताचा श्रीलंकेवर ६ विकेटनं विजय, तिसऱ्या वनडेसह सीरिजही जिंकली

 हैदराबादमध्ये झालेली भारत विरुद्ध श्रीलंके दरम्यानची तिसरी वनडे मॅच भारतानं ६ विकेटनं जिंकलीय. भारताकडून सर्वच बॅट्समननी चांगली खेळी खेळली. तर महेला जयवर्धने मॅन ऑफ द मॅच ठरला.

Updated: Nov 9, 2014, 09:26 PM IST
भारताचा श्रीलंकेवर ६ विकेटनं विजय, तिसऱ्या वनडेसह सीरिजही जिंकली title=

हैदराबाद:  हैदराबादमध्ये झालेली भारत विरुद्ध श्रीलंके दरम्यानची तिसरी वनडे मॅच भारतानं ६ विकेटनं जिंकलीय. भारताकडून सर्वच बॅट्समननी चांगली खेळी खेळली. तर महेला जयवर्धने मॅन ऑफ द मॅच ठरला.

शिखर धवन पुन्हा नर्व्हेस नाईंटीचा शिकार झाला. तो ९१ रन्सवर आऊट झाला. तर भारताचा चौथा बॅट्समन आणि कॅप्टन विराट कोहली ५३ रन्सवर आऊट झाला. टीम इंडियानं मॅच सहा विकेट राखून दमदार विजय मिळवला आणि मॅचसोबत सीरिजही जिंकली.  

त्यापूर्वी टॉस जिंकून श्रीलंकेनं पहिली बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र भारतीय बॉलर्ससमोर श्रीलंकेच्या बॅट्समननी शरणागती पत्कारली. परेरा आणि संगकारा हे आघाडीचे बॅट्समन स्वस्तात तंबूत परतल्यानं श्रीलंकेची अवस्था अवघ्या ७ रन्सवर दोन आऊट अशी झाली होती. त्यानंतर दिलशान आणि महेला जयवर्धने या फलंदाजांनी शतकी भागीदारी करत श्रीलंकेच्या डाव तारला. 

दिलशानला ५३ रन्सवर आऊट करण्यात भारतीय बॉलर्सला यश आलं. त्यानंतर शतकवीर महेला जयवर्धनेनं एकाकी झुंज देत श्रीलंकेचा डाव पुढं नेला. त्याला सीकुगे प्रसन्नानं २९ धावांची मोलाची साथ दिली. महेला जयवर्धननं ११८ धावांवर असताना आर. अश्विनच्या फिरकीनं त्याची विकेट घेतली. अखेरीस श्रीलंकेचा डाव २४२ धावांवरच आटोपला. भारतातर्फे उमेश यादवनं चार, अक्षर पटेलनं तीन तर धवल कुलकर्णी, आर. अश्विन आणि अंबाटी रायडू यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.