कोलकाता : भारताच्या रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात तडाकेबाज द्विशतक झळकावले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन द्विशतके करणारा रोहित जगात एकमेव फलंदाज ठरलाय. त्याने २६४ रन्स ठोकल्यात.
एकदिवसीय सामन्यात द्विशतक साजरे करणार्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवागनंतर आपले नाव रोहितने कोरले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक धावा रचणाऱ्या वीरेंद्र सेहवागच्या २१९ रन्सचा विक्रम मोडीत काढत २६४ रन्सची ऐतिहासिक खेळी केली. भारताने ५ विकेटच्या बदल्यात श्रीलंकेसमोर ४०४ रन्सचा डोंगर उभा केलाय.
विराट कोहलीनेही कर्णधारी खेळी करून रोहीतला ६६ रन्सची साथ दिली. कोहली बाद झाल्यानंतरही दबावाखाली न खेळता रोहितने आपली फटकेबाजी सुरू ठेवून संघाच्या धावसंख्येला आकार दिला. रोहीतच्या फलंदाजीसमोर श्रीलंकेचे सर्वच गोलंदाज निष्प्रभ ठरले. आपली स्फोटक फलंदाजी कायम ठेवत रोहितने कारकिर्दीतील दुसरे द्विशतक ठोकले. याआधी मुंबईकर रोहितने आपल्या होमग्राऊंड वानखेडेवर २०९ रन्सची खेळी केली होती.
कोलकाताच्या इडन गार्डनवर सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय भारताने घेतला. भारतीय संघाचे दोन फलंदाज झटपट माघारी परतले. सलामीवर अजिंक्य राहणे २८ तर, अंबाती रायडू अवघ्या ८ रन्स करून बाद झाला.
याआधीच्या तिन्ही सामन्यात भारताने दणदणीत विजय साजरा करून ही मालिका आपल्या खिशात टाकली. टीम इंडियात रोहीत शर्माला या सामन्यात संघात स्थान देण्यात आले. या संधीचे रोहितने सोने केले. कर्णधार विराट कोहलीने भारताचा डाव सावरत संयमी फलंदाजी केली. मात्र, आक्रमकपणा रोहित शर्मा धारण केला. त्यांने २६४ रन्सची विश्वविक्रमी कामगिरी केली. त्याने १७३ बॉल्समध्ये ३३ चौकारांची बरसात आणि ९ षटकारांची आतषबाजी केली.
वन डेमध्ये सर्वाधिक रन्स करणारे दहा खेळाडू |
||||||
फलंदाज आणि देश |
स्कोअर |
चेंडू |
चौकार |
षटकार |
विरुद्ध |
तारीख |
रोहित शर्मा, भारत |
264 |
173 |
33 |
9 |
श्रीलंका |
13-Nov-14 |
वीरेंद्र सेहवाग, भारत |
219 |
149 |
25 |
7 |
वेस्ट इंडिज |
08-Dec-11 |
रोहित शर्मा, भारत |
209 |
158 |
12 |
16 |
ऑस्ट्रेलिया |
02-Nov-13 |
सचिन तेंडुलकर, भारत |
200* |
147 |
25 |
3 |
दक्षिण आफ्रिका |
24-Feb-10 |
सईद अन्वर, पाकिस्तान |
194 |
146 |
22 |
5 |
भारत |
21-May-97 |
चार्ल्स कोव्हेंट्री, झिम्बाब्वे |
194* |
156 |
16 |
7 |
बांग्लादेश |
16-Aug-09 |
मार्टीन गुप्टील, न्यूझीलंड |
189* |
155 |
19 |
2 |
इंग्लंड |
02-Jun-13 |
व्हीव्हीयन रिचर्ड्स, वेस्ट इंडिज |
189* |
170 |
21 |
5 |
इंग्लंड |
31-May-84 |
सनथ जयसूर्या, श्रीलंका |
189 |
170 |
21 |
5 |
भारत |
29-Oct-00 |
गॅरी कर्स्टन, दक्षिण आफ्रिका |
188* |
159 |
23 |
4 |
युएई |
16-Feb-96 |
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.