नाबाद ११८ धावा ठोकणारा मोहम्मद ठरला अफगाणिस्तानचा पहिला शतकवीर

अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादने झिम्ब्बावेविरुद्धच्या टी-२० सामन्यात नाबाद ११८ धावा ठोकताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा रेकॉर्ड रचलाय.

Updated: Jan 11, 2016, 02:39 PM IST
 नाबाद ११८ धावा ठोकणारा मोहम्मद ठरला अफगाणिस्तानचा पहिला शतकवीर title=

शारजा : अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादने झिम्ब्बावेविरुद्धच्या टी-२० सामन्यात नाबाद ११८ धावा ठोकताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा रेकॉर्ड रचलाय.

नाबाद शतक करणारा तो अफगाणिस्तानचा पहिला, आशियाताली पाचवा आणि आंतरराष्ट्रीय वैयक्तित स्तरावर सर्वाधिक धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरलाय. 

सलामीवीर शहजादने ६७ चेंडूत १० चौकार आणि आठ षटकारांसह नाबाद ११८ धावांची तुफान खेळी केली. दोन आठवड्यांपूर्वी झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे सामन्यात शहजाजने १३१ धावांची नाबाद खेळी केली होती.