आफ्रिदीचा क्रिकेटला अलविदा, कोहलीनं दिलं खास गिफ्ट

पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. 

Updated: Apr 21, 2017, 07:16 PM IST
आफ्रिदीचा क्रिकेटला अलविदा, कोहलीनं दिलं खास गिफ्ट  title=

मुंबई : पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. शाहिद आफ्रिदीनं हा निर्णय घेतल्यानंतर भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं त्याला खास गिफ्ट दिलं आहे. आफ्रिदीला गिफ्ट म्हणून विराटनं त्याची जर्सी दिली आहे. या जर्सीवर कोहलीबरोबरच भारतीय क्रिकेटपटूंच्या सह्या आहेत.

शाहिद भाई, तुला शुभेच्छा. तुझ्याविरुद्ध खेळताना नेहमीच मजा यायची असं या जर्सीवर विराटनं लिहीलं आहे. विराटच्या या गिफ्टवर आफ्रिदीनंही प्रतिक्रिया दिली आहे. विराट कोहली आणि भारतीय टीमचे गिफ्ट दिल्याबद्दल धन्यवाद. आपण लवकरच भेटू, असं ट्विट आफ्रिदीनं केलं आहे.