'रियो'त देशासाठी मेडल पटकावून आणणार : नरसिंग यादव

 नाडानं क्लीन चिट दिल्यानंतर नरसिंग यादवनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर त्यानं पंतप्रधानांचे आभार मानले. त्याचप्रमाणे रियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी मेडल पटकावून आणण्याचा विश्वास त्यानं यावेळी व्यक्त केला. 

Updated: Aug 2, 2016, 09:50 PM IST
'रियो'त देशासाठी मेडल पटकावून आणणार : नरसिंग यादव title=

नवी दिल्ली :  नाडानं क्लीन चिट दिल्यानंतर नरसिंग यादवनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर त्यानं पंतप्रधानांचे आभार मानले. त्याचप्रमाणे रियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी मेडल पटकावून आणण्याचा विश्वास त्यानं यावेळी व्यक्त केला. 

नरसिंग यादव कुस्तीमध्ये ७४ किलो वजनीगटात भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. त्यानं नाडासमोर आपली  बाजू मांडली. त्याचप्रमाणे नरसिंग हा कटकारस्थानाचा बळी असल्याचं स्पष्ट केले होते. 

यावेळी मोदींनी आपल्याला आशीर्वाद देताना, आणखी चांगली कामगिरी कर म्हणजे तुझ्यावर कधीच अन्याय होणार नाही, असा कानमंत्र दिल्याचे नरसिंगने सांगितले.