रवींद्र जडेजाऐवजी अक्षर पटेलला टीम इंडियात स्थान

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियात खेळाडू रवींद्र जडेजा याला दुखापत झाली आहे, जडेजाच्या जागी फिरकीपटू अक्षर पटेल यांची निवड करण्यात आल्याचे, बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

Updated: Dec 22, 2014, 05:59 PM IST
रवींद्र जडेजाऐवजी अक्षर पटेलला टीम इंडियात स्थान title=

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियात खेळाडू रवींद्र जडेजा याला दुखापत झाली आहे, जडेजाच्या जागी फिरकीपटू अक्षर पटेल यांची निवड करण्यात आल्याचे, बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ दोन कसोटी सामने खेळला असून, या दोन्ही सामन्यांत भारताला पराभव स्वीकारावा लागलेला आहे. 

उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी संघात हा बदल करण्यात आला आहे. जडेजाच्या खांद्याला दुखापत झाल्याने पटेलला संधी देण्यात आली आहे. 

पटेल सध्या रणजी स्पर्धेत खेळत असून, त्याची कामगिरी चांगली होत आहे. त्याने गुजरातकडून खेळताना सौराष्ट्राचे चार बळी घेतले आहेत. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळविला जाणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.