मारामारी करणाऱ्या बॉक्सर आमिर खानला अटक

मूळचा पाकिस्तानी असलेला ब्रिटीश बॉक्सर आमिर खानला बोल्टनमध्ये दोन युवकांवर हल्ला केल्याच्या गुन्ह्यात अटक झाली. पूर्व वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिम्पिक सिल्वर  मेडल विजेता आमिरला बोल्टनच्या रिसेल             रस्त्यावर झालेल्या या घटनेनंतर लगेच अटक करण्यात आली.

Updated: Jul 6, 2014, 07:14 PM IST
मारामारी करणाऱ्या बॉक्सर आमिर खानला अटक  title=
फाईल फोटो

बोल्टन : मूळचा पाकिस्तानी असलेला ब्रिटीश बॉक्सर आमिर खानला बोल्टनमध्ये दोन युवकांवर हल्ला केल्याच्या गुन्ह्यात अटक झाली. पूर्व वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिम्पिक सिल्वर  मेडल विजेता आमिरला बोल्टनच्या रिसेल             रस्त्यावर झालेल्या या घटनेनंतर लगेच अटक करण्यात आली.

पोलिसांनी सांगितले की, दोन्ही युवक जवळच असलेल्या एका मस्जिदहून परत येत होते.  युवक जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर नाही सामान्य आहे. एकाला चेहऱ्याला तर दुसऱ्याला पायाला लागले आहे. 

एका महिला साक्षीदाराने सांगितले की, खूप आवाज ऐकू येत होता, मी आमिरची कार पाहिली. त्याला कारमधून बाहेर येताना पाहिले. त्यानंतर काहीवेळाने तो गाडी घेऊन निघून गेला एक व्यक्ती जमीनीवर पडला होता. 

'द टेलिग्राफ'च्या माहितीनूसार, दोन्ही युवक हे आमिरला ओळखत होते. आमिरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पीआर कंपनीने सांगितले की, आमिरनं ४ जुलैला केलेल्या मारहाणीमध्ये अटक केली होती. त्याची पुढील चौकशी करणार असल्यानं कोणतेही आरोप नसल्यानं त्याची सुटका केली आहे. या मुद्द्यांवर आम्ही अजून काही बोलू शकत नाही. 

पोलिसांच्या सांगण्यानूसार, शुक्रवारी रात्री दीड वाजता पोलिसांना बोल्टनमध्ये मारमारी झाल्याची बातमी समजली. पोलीस रसेल स्ट्रीटवर गेले आणि त्यांना दिसले की १९ वर्षांच्या युवकांना मारले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती गंभीर होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.