अमिताभ बच्चन कॉमेंट्रीटरवर भडकले

अत्यंत रोमहर्षक अशा बांग्लादेशविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा शेवटच्या बॉलवर विजय झाला.

Updated: Mar 24, 2016, 04:31 PM IST
अमिताभ बच्चन कॉमेंट्रीटरवर भडकले title=

बैंगळुरु: अत्यंत रोमहर्षक अशा बांग्लादेशविरुद्धच्या मॅचमध्ये भारताचा शेवटच्या बॉलवर विजय झाला.

भारताचा विजय झाला असला तरी बिग बी अमिताभ बच्चन मात्र भारतीय कॉमेंटेटर्सवर भडकले. भारतीय कॉमेंटेटर्सनी प्रत्येक वेळी दुसऱ्या टीमच्या खेळाडूंविषयी बोलण्यापेक्षा आपल्या खेळाडूंविषयी बोलावं असं ट्विट बिग बींनी केलं. 

 

बांग्लादेशच्या या मॅचमधल्या कामगिरीवर भारतीय कॉमेंटेटर्स खुष झाले आणि त्यांनी बांग्लादेशी खेळाडूंचं कौतूक केलं, ज्यामुळे बिग बी भडकले. 

दरम्यान बिग बींच्या या ट्विटला या मॅचची कॉमेंट्री करणाऱ्या हर्षा भोगलेनं प्रत्युत्तर दिलं आहे. बांग्लादेशच्या या टीममध्ये सर्वोत्तम खेळाडू आहेत, हे मी आधीही म्हंटलं होतं, आणि यानंतरही म्हणीन असं ट्विट हर्षा भोगलेनं केलं आहे. 

 

ट्विटरवर अमिताभ यांच्या फॅन्सनी दिलेल्या प्रतिक्रियांनाही बिग बींनी उत्तर दिलं आहे. प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते, आपली टीम आणि आपले खेळाडू चुकीचे दाखवले जातात, हे निराशाजनक आहे. दुसऱ्या देशाचे कॉमेंटेटर्स आपल्या खेळाडूंविषयी काय म्हणतात हे एकदा पाहा, असं बिग बी म्हणाले आहेत.