मुंबई : क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियामध्ये एकत्र दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका... कारण, बीसीसीआयनं अनुष्काला सोबत घेण्यासाठी विराटला परवानगी देऊन टाकलीय.
बोर्डानं भारतीय क्रिकेटर्सच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडसना ऑस्ट्रेलियाच्या १५ दिवसांच्या दौऱ्यात सोबत राहण्यासाठी परवानगी दिलीय. बीसीसीआयनं क्रिकेटर्सच्या पत्नींची राहण्याची व्यवस्था केली असली तर अनुष्का शर्मा मात्र विराट कोहलीच्या रुममध्ये राहू शकणार नाहीय. त्याच हॉटेलमधल्या दुसऱ्या एखाद्या रुममध्ये मात्र ती राहू शकते.
एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या बातमीनुसार, १२ क्रिकेटर्सच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडस ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहेत. यामध्ये, एक बॉलिवूड स्टारचादेखील समावेश असेल.
बीसीसीआयनं क्रिकेटर्सना अगोदरच सूचना देऊन टाकलीय की त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत केवळ चौथ्या टेस्टपर्यंतच राहू शकतात. सिडनीला होणारी चौथी टेस्ट १० जानेवारी रोजी संपणार आहे.
यापूर्वी, अनुष्का आणि विराट इंग्लंड दौऱ्यावरही एकत्र दिसले होते. पण, या दौऱ्यात विराटची कामगिरी खूपच खराब झाली होती... आणि त्याचं खापर बिचाऱ्या अनुष्कावर फोडण्यात आलं होतं... त्यानंतर या दोघांच्या एकत्र राहण्यावर वादही निर्माण झाला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.