दाढी केलीस तर बघ, अनुष्काची विराटला तंबी

विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं नातं आता सर्वश्रुत आहे. सोशल मीडियामधून हे दोघंही या नात्याबाबत नेहमीच भाष्य करतात.

Updated: Apr 25, 2017, 04:10 PM IST
दाढी केलीस तर बघ, अनुष्काची विराटला तंबी  title=

मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं नातं आता सर्वश्रुत आहे. सोशल मीडियामधून हे दोघंही या नात्याबाबत नेहमीच भाष्य करतात. आता पुन्हा एकदा विराटनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

भारताचे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेचा दाढी केलेला नवा लूक आयपीएलमध्ये पाहायला मिळत आहे. तुम्ही सगळ्यांनी दाढी केली असली तरी मला मात्र दाढी करायला परवानगी नाही, असा मेसेज असलेला फोटो विराटनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. विराटच्या या फोटोवर अनुष्का शर्मानंही कमेंट केली आहे. तु दाढी करू शकत नाहीस, असं अनुष्का म्हणाली आहे.