अश्विनच्या नावे झाला क्रिकेट इतिहासातील मोठा रेकॉर्ड

रविचंद्रन अश्विन टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५० विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. अश्विनने त्याच्या ४५ व्या टेस्टमध्ये हा रेकॉर्ड बनवला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज जलद गोलंदाज डेनिस लिलीचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. त्याने ४८ मॅचमध्ये २५० विकेट घेतले होते.

Updated: Feb 12, 2017, 01:30 PM IST
अश्विनच्या नावे झाला क्रिकेट इतिहासातील मोठा रेकॉर्ड title=

हैदराबाद : रविचंद्रन अश्विन टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५० विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. अश्विनने त्याच्या ४५ व्या टेस्टमध्ये हा रेकॉर्ड बनवला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज जलद गोलंदाज डेनिस लिलीचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. त्याने ४८ मॅचमध्ये २५० विकेट घेतले होते.

बांग्लादेश विरोधातील टेस्ट मॅचमध्ये चौथ्या दिवशी अश्विनने हा रेकॉर्ड केला. मॅच सुरु झाल्यानंतर आधी अश्विनने ४४ टेस्ट मॅचमध्ये २४८ विकेट घेतले होते. अश्विनने १५ व्या ओव्हरमध्ये शाकिब-अल-हसनला आऊट करत मॅचमधली पहिली विकेट घेतली. आणि करिअरमधली २५० वी विकेट.

भारताकडून सगळ्यात कमी सामन्यांमध्ये २५० विकेट घेण्याचा रेकॉर्ड अनिल कुंबळे यांच्या नावावर होता. त्यांनी ५५ टेस्टमध्ये न्यूझीलंडच्या विरोधात कानपूरमध्ये हा रेकॉर्ड केला होता. डेल स्टेनने ४९ टेस्ट सामन्यांमध्ये हा रेकॉर्ड केला आहे.