ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन

ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा क्रिकेट वर्ल्डकप जिंकला आहे, ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला, ऑस्ट्रेलियाने मेलबर्नच्या अंतिम सामन्यात तब्बल आठ वर्षांनी वर्ल्डकपवर पुन्हा आपलं नाव कोरलंय.

Updated: Mar 29, 2015, 07:15 PM IST
ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन title=

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा क्रिकेट वर्ल्डकप जिंकला आहे, ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडचा सात विकेट्सनी धुव्वा उडवला, ऑस्ट्रेलियाने मेलबर्नच्या अंतिम सामन्यात तब्बल आठ वर्षांनी वर्ल्डकपवर पुन्हा आपलं नाव कोरलंय.

ऑस्ट्रेलियानं याआधी  १९८७, १९९९, २००३ आणि २००७ साली वर्ल्डकप जिंकला होता.मायकल क्लार्क हा वर्ल्डकप जिंकणारा ऑस्ट्रेलियाचा चौथा कॅप्टन ठरला. 

मेलबर्नवरच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजयाचा पाया घातला, तो त्यांच्या गोलंदाजांनी. स्टार्क, जॉन्सन, फॉकनर आणि मॅक्सवेल यांच्या प्रभावी आक्रमणासमोर न्यूझीलंडचा अख्खा डाव ४५ षटकांत केवळ 183 धावांत आटोपला होता.

मायकल क्लार्क आणि स्टीव्हन स्मिथ यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अखेरचा वन डे सामना खेळणाऱ्या कर्णधार क्लार्कने सर्वाधिक ७४  धावा केल्या. तर त्याला उत्तम साथ देत स्टिव्हन स्मिथनेही नाबाद अर्धशतक झळकावलं.

या सामन्यात तीन विकेट पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलिच्या जेम्स फॉक्नरला सामनावीर, तर संपूर्ण मालिकेत २२ विकेट घेणाऱ्या मिचेल स्टार्कला मालिकावीराचा किताब देण्यात आला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते या दोघांचा सन्मान करण्यात आला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x