पर्थ : ऑस्ट्रेलियाने आज झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानला क्रिकेटचा धडा शिकवून वर्ल्ड कपमध्ये एका इनिंगमध्ये सर्वाधिक रन्स आणि सर्वाधिक अंतराने विजयाचे दोन भारतीय रेकॉर्ड तोडले आहे.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ४१७ धावांचा विशाल डोंगर उभारला. भारताने २००७मध्ये वर्ल्ड कप सामन्यात बर्म्युडा विरूद्ध पाच विकेट गमावून ४१३ धावा केल्या होत्या.
तसेच ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानला १४२ धावात गारद केले. त्यामुळे त्यांनी तब्बल २७५ धावांनी विजय मिळावून वर्ल्ड कपमधील सर्वात मोठी विजयाची नोंद केली. या पूर्वी भारताने बरमुडाला २५७ धावांनी नमवले होते.
वन डे क्रिकेटमधील सर्वात मोठ्या विजयाचा रेकॉर्ड न्यूझीलंडच्या नावावर आहे. २००८ मद्ये आर्यलँडला २९० धावांनी पराभूत केले होते. ऑस्ट्रेलियाचा अफगाणिस्तानवर दुसरा सर्वात मोठा ठरला आहे.
त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वे २०१० मध्ये २७२ धावा आणि श्रीलंकेवर २०१२ मध्ये २५८ धावांनी विजयाचा क्रमांक लागतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.