धोनी, कोहलीच्या नावाची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीला पद्मभूषण आणि धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीची पद्मश्री पुरस्कारासाठी बीसीसीआयनं शिफारस केली आहे. बीसीसीआयनं क्रीडामंत्रालयाकडे या दोघांच्या पुरस्कारासाठी ही शिफारस केलीय. 

Updated: Aug 13, 2014, 02:53 PM IST
धोनी, कोहलीच्या नावाची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस title=

नवी दिल्ली: टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीला पद्मभूषण आणि धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीची पद्मश्री पुरस्कारासाठी बीसीसीआयनं शिफारस केली आहे. बीसीसीआयनं क्रीडामंत्रालयाकडे या दोघांच्या पुरस्कारासाठी ही शिफारस केलीय. 

महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहलीनं भारताला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. त्यामुळंच त्यांची या पुरस्कारांसाठी शिफारस करण्याचा निर्णय घेतलाय. 

याशिवाय, बीसीसीआयनं भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राजच्या नावाचीही पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस केलीय. टीम इंडियाचा कॅप्टन धोनीला 2009मध्ये पद्मश्री पुरस्काल दिला गेलाय. 

धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियानं वनडे आणि टी-20 वर्ल्डकप जिंकलाय. याशिवाय गेल्यावर्षी भारतानं इंग्लंडला फायनलमध्ये हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीवरही विजय मिळवलाय. धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये भारतानं ठराविक ओव्हरच्या महत्तपूर्ण आयसीसी टूर्नामेंट जिंकल्यात. विराट कोहली बद्दल बोलायचं झालं तर सध्याचा इंग्लंड दौरा सोडला तर कोहलीनं देशासाठी विराट प्रदर्शन केलंय. क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमध्ये त्यानं आपली बॅटिंगची कमाल दाखवलीय. सध्या तो ऑऊट ऑफ फॉर्म चाललाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.