हैदराबाद : बांग्लादेशविरुद्धच्या एकुलत्या एक टेस्टमध्ये भारताचा 208 रननी विजय झाला आहे. डबल सेंच्युरी मारणारा विराट कोहली आणि उल्लेखनीय बॉलिंग करणारे अश्विन-जडेजा हे मॅचविनर ठरले असले तरी भुवनेश्वर कुमारनं या मॅचमध्ये घेतलेला मेहंदी हसनचा अफलातून बोल्डही लक्षात राहण्यासारखा आहे.
चौथ्या दिवसाची पहिली ओव्हर कोहली उमेश यादवला देणार होता, पण ऐनवेळी त्यानं हा निर्णय बदलून बॉल भुवनेश्वरकडे दिला आणि भुवनेश्वरनंही कॅप्टन कोहलीचा विश्वास सार्थ ठरवला.