विराट नाही, अजिंक्यच तिसऱ्या स्थानावर खेळणार; धोनीचा फैसला!

भारतीय वनडे टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि उप-कॅप्टन विराट कोहली यांच्यात काहीसा बेबनाव सुरू असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्यात. या चर्चांना आता आणखी हवा मिळणार आहे. कारण आहे धोनीनं घेतलेला एक नवा निर्णय... 

Updated: Oct 16, 2015, 06:57 PM IST
विराट नाही, अजिंक्यच तिसऱ्या स्थानावर खेळणार; धोनीचा फैसला! title=

मुंबई : भारतीय वनडे टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि उप-कॅप्टन विराट कोहली यांच्यात काहीसा बेबनाव सुरू असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्यात. या चर्चांना आता आणखी हवा मिळणार आहे. कारण आहे धोनीनं घेतलेला एक नवा निर्णय... 

इंदौर वनडेमध्ये मिळालेल्या विजयानंतर धोनीनं मीडियाशी बोलताना त्याचा एक नवा निर्णय जाहीर केला. यापुढे अजिंक्य राहाणे हाच क्रमांक 3 वर खेळेल... आणि विराट कोहली 4 वर... असं त्यानं यावेळी स्पष्ट केलं. 

अधिक वाचा - जिंकल्यानंतरही पराभूत झाला कर्णधार धोनी!

'राहाणे असा खेळाडू आहे जो खेळाच्या सुरुवातीलाच विरोधी टीमला त्रासदायक ठरू शकतो... तो एक शानदार खेळाडू आहे... आणि तो खूप मोकळेपणानं बॅटिंग करू शकतो. विराट हा असा खेळाडू आहे जो 4 थ्या क्रमांकावरही खेळू शकतो... पण, राहाणे तिसऱ्या क्रमांकावर खेळल्यानं टीमला फायदाच होईल' असं यावेळी धोनीनं म्हटलं. 

अधिक वाचा - अनेक जण नंग्या तलवारी घेऊन माझ्यासाठी उभे असतात : धोनी

आत्ता-आत्तापर्यंत विराट कोहली 3 नंबरवर खेळत आलाय... आणि याच स्थानावर राहून त्यानं जोरदार खेळीही केलीय. 

अधिक वाचा - क्रिकेटच्या इतिहासातील 'दी बेस्ट कॅचेस'

पण, नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वन-डे सामन्यात भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य राहणे एकमेकांना मैदानातच भिडलेले अनेकांनी पाहिले होते. राहाणे आणि कोहलीत असलेल्या विसंवादाचा परिणाम म्हणून अवघ्या 12 रन्सवर विराट आऊट झालेला दिसला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.