वेलिंग्टन : न्यूझीलंडचा कर्णधार ब्रॅन्डन मॅकुलम यांने वर्ल्डकप २०१५मध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकले. त्याने २५ बॉलमध्ये ७७ रन्स फटकावल्यात.
न्यूझीलंडविरोधातील सामन्यात इंग्लंडची दयनीय अवस्था पाहायला मिळाली. ३३.३ ओव्हरमध्ये इंग्लंडचा डाव आटोपला. इंग्लंडने १२३ रन्स केल्या. आतापर्यंतची ही सर्वाधिक कमी धावसंख्या आहे.
न्यूझीलंडच्या ब्रॅन्डन मॅकुलमने तुफानी फटकेबाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. त्याने १८ बॉल्समध्ये अर्धशतक पूर्ण केले आहे. त्यात ७ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. २५ बॉलमध्ये ७७ रन्स करून तो आऊट झाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.