दक्षिण आफ्रिकेच्या मॅचमध्ये विराटचा नवा लूक!

वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला हरवल्यानंतर टीम इंडियाचे क्रिकेटर पुन्हा मजा-मस्ती करतांना दिसले. रविवारी आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मॅचपूर्वी टीम इंडियाचे अनेक खेळाडू नेट प्रॅक्टिसपासून दूर राहिले. जिथं टीमचे डायरेक्टर रवी शास्त्री शॉपिंग मॉलमध्ये दिसले. तर भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली तेव्हा आपला लूक बदलत होता. 

Updated: Feb 20, 2015, 09:37 AM IST
दक्षिण आफ्रिकेच्या मॅचमध्ये विराटचा नवा लूक! title=

मेलबर्न: वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला हरवल्यानंतर टीम इंडियाचे क्रिकेटर पुन्हा मजा-मस्ती करतांना दिसले. रविवारी आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मॅचपूर्वी टीम इंडियाचे अनेक खेळाडू नेट प्रॅक्टिसपासून दूर राहिले. जिथं टीमचे डायरेक्टर रवी शास्त्री शॉपिंग मॉलमध्ये दिसले. तर भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली तेव्हा आपला लूक बदलत होता. 

दक्षिण आफ्रिकेच्या मॅचमध्ये विराट कोहली नव्या लूकमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे विराटनं आपली नवी हेअर स्टाइल प्रसिद्ध फुटबॉल प्लेअर क्रिस्टियानो रोनाल्डोसारखी केलीय.

मेलबर्नचा प्रसिद्ध हेअर ड्रेसर टोनी एंड गायच्या सलूनमध्ये विराटनं आपला लूक बदलला. विराट हॉटेलमधून बाहेर पडला सरळ टॅक्सी केली आणि टोनी एंड गाय सलूनला पोहोचला. तिथं आजूबाजूला पहिले तो फिरला आणि नंतर सलूनमध्ये जावून हेअर स्टाइल बदलली. एक तासानंतर जेव्हा विराट सलूनच्या बाहेर आला तेव्हा तो पूर्णपणे बदललेला दिसत होता.

विराट रोनाल्डोचा चाहता आहे. त्याच्या पूर्वीच्या हेअर स्टाइलही रोनाल्डोशी मिळत्याजुळत्या होत्या. आता पुन्हा त्यानं रोनाल्डोसारखीच हेअर स्टाइल केलीय. विराटच्या चाहत्यांना हा लूक येत्या मॅचमध्ये दिसेलच. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.