कॅप्टन कूल धोनी पराभवानंतर पहिल्यांदाच भडकला

क्रिकेटच्या मैदानावर कधी असं झालं नसेल की कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी भडकला असेल. पण काल झालेल्या गुजरात विरोधातील पराभवानंतर धोनी भडकला. या रोमांचित मॅचमध्ये पुण्याला ३ विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. शेवटच्या बॉलवर फॉक्नरने फोर मारला आणि धोनीच्या आशा संपल्या. 

Updated: Apr 30, 2016, 07:19 PM IST
कॅप्टन कूल धोनी पराभवानंतर पहिल्यांदाच भडकला title=

मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर कधी असं झालं नसेल की कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी भडकला असेल. पण काल झालेल्या गुजरात विरोधातील पराभवानंतर धोनी भडकला. या रोमांचित मॅचमध्ये पुण्याला ३ विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. शेवटच्या बॉलवर फॉक्नरने फोर मारला आणि धोनीच्या आशा संपल्या. 

शेवटच्या ओव्हरमध्ये धोनीवर खूप प्रेशर दिसत होतं. धोनीने त्याचा राग हा बॉलर्सवर उतरवला. धोनीने त्याच्या बॅट्समनचं कोतूक केलं पण बॉलर हे डिफेंड करण्यात अपयशी ठरले असं धोनीने म्हटलं.

धोनी म्हणतो की खूप साऱ्या गोष्टी सुधारण्याची गरज आहे. खास करुन बॉलिंग. धोनीने म्हटलं की त्याच्याकडे जास्त बॉलर्सचा पर्याय नाही आहे. अश्विन फॉर्ममध्ये नसणं आणि ड्युप्लेसी आणि पीटरसन टीममधून बाहेर झाल्याने धोनीच्या चिंता वाढल्या आहेत.