ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिका, भारताची १८ला मॅच

ऑस्ट्रेलियात कार्ल्टन मीड ट्रॅग्युलर सिरिज अशा तिरंगी मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मालिका १६ जानेवारीपासून सुरु होणार आहे.

Updated: Jan 15, 2015, 02:21 PM IST
ऑस्ट्रेलियात तिरंगी मालिका, भारताची १८ला मॅच title=

सिडनी : ऑस्ट्रेलियात कार्ल्टन मीड ट्रॅग्युलर सिरिज अशा तिरंगी मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मालिका १६ जानेवारीपासून सुरु होणार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पहिला सामना १६ जानेवारी होणार आहे. तर दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात होणार आहे. हा सामना १८ जानेवारीला होणार आहे. तर भारताचा दुसरा सामना २० जानेवारीला इंग्लंड विरुद्ध होईल.

२३ जानेवारीला ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड, २६ जानेवारीला ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत आणि ३० जानेवारीला इंग्लंड विरुद्ध भारत सामना होणार आहे. अंतिम सामना १ फेब्रुवारीला पर्थ येथे होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.