आयपीएल ११मध्ये राजस्थान आणि चेन्नई करणार कमबॅक

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदी घालण्यात आलेले राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज आयपीएलच्या ११व्या हंगामात पुनरागमनासाठी सज्ज झालेत. २०१८मध्ये या दोन्ही संघावरील बंदी उठणार आहे.

Updated: May 2, 2017, 12:43 PM IST
आयपीएल ११मध्ये राजस्थान आणि चेन्नई करणार कमबॅक title=

मुंबई : स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदी घालण्यात आलेले राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज आयपीएलच्या ११व्या हंगामात पुनरागमनासाठी सज्ज झालेत. २०१८मध्ये या दोन्ही संघावरील बंदी उठणार आहे.

चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे संघ ११व्या हंगामात रायजिंग पुणे सुपरजायंट आणि गुजरात लायन्स यांची जागा घेतील. एका रिपोर्टनुसार बीसीसीआयटे अधिकारी राहुल जौहरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११व्या हंगामात केवळ ८ संघ असतील. 

जौहरी म्हणाले, चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यावरील बंदी २०१८ मध्ये संपुष्टात येईल. बीसीसीआय आयपीएलमध्ये संघ वाढवण्याच्या विचारात नाही आहे. चेन्नई आणि राजस्थान पुढील वर्षी पुणे आणि गुजरातची जागा घेतील.