गेलची विस्फोटक खेळी, ३ चेंडू हरविले नदीमध्ये

 २२८ षटकारसह आयपीएलमध्ये सिक्सर किंग ठरलेला क्रिस गेल आता इंग्लडमध्ये आपल्या विस्फोटक फलंदाजीचा नमुना दाखविला. इंग्लडमध्ये पहिल्या सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले. 

Updated: Jun 1, 2015, 07:14 PM IST
गेलची विस्फोटक खेळी, ३ चेंडू हरविले नदीमध्ये  title=

समरसेट :  २२८ षटकारसह आयपीएलमध्ये सिक्सर किंग ठरलेला क्रिस गेल आता इंग्लडमध्ये आपल्या विस्फोटक फलंदाजीचा नमुना दाखविला. इंग्लडमध्ये पहिल्या सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले. 

आपल्या तडाखेबंद खेळीत त्याने १५ षटकार लगावले. ६२ चेंडूत त्यांने १५१ धावा ठोकल्या. 

रविवारी खेळण्यात आलेल्या या टी-२० सामनन्यात केंटने प्रथम फलंदाजी करत सॅम नॉर्थइस्टच्या ११४ धावांच्या जोरावर सात विकेटवर २२७ धावांचा डोंगर उभा केला. 

लक्ष्यचा पाठलाग करताना समरसेटचे दोन विकेट २२ धावांवर गेल्या. त्यानंतर गेल मैदानात आल्यावर त्याने आठ चेंडूत तीन षटकार लगावले. मग तोंडाला रक्त लागलेल्या वाघाप्रमाणे त्याने एकानंतर एक १५ षटकार लगावले. यातील तीन वेळा स्टेडिअमच्या बाहेर असलेल्या नदीत चेंडू पडला आणि गायब झाला. 

अशी खेळी केली तरी गेल आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. समरसेट ३ धावांनी पराभूत झाले. 

पाहा गेलच्या खेळीचा शानदार व्हिडिओ...

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.