ह्युजच्या सन्मानार्थ क्लब बॅट्समननं दिली रेकॉर्डला तिलांजली

विक्टोरियामध्ये एका क्लब मॅचमध्ये बॅट्समननं फिलीप ह्युजला एक हृदयस्पर्शी श्रद्धांजली देत, एक खूप जुना रेकॉर्ड तोडण्याची सुवर्ण संधी सोडून दिली. 

PTI | Updated: Dec 1, 2014, 03:10 PM IST
ह्युजच्या सन्मानार्थ क्लब बॅट्समननं दिली रेकॉर्डला तिलांजली title=

सिडनी: विक्टोरियामध्ये एका क्लब मॅचमध्ये बॅट्समननं फिलीप ह्युजला एक हृदयस्पर्शी श्रद्धांजली देत, एक खूप जुना रेकॉर्ड तोडण्याची सुवर्ण संधी सोडून दिली. 

एका रिपोर्टनुसार बालारेट क्लब टीम हाडनचा कॅप्टन शॉन मॅकआर्थर त्यावेळी २२० रन्सवर खेळत होता. स्थानिक प्रतिद्वंद्वी वीआरआय डेलाकोंबेच्या विरुद्ध मॅचमध्ये क्लबचा बॅटिंगचा रेकॉर्ड तोडायच्या तो अगदी जवळ पोहोचला होता. पण त्यावेळी त्यानं स्कोअरबोर्डकडे पाहिलं आणि आपण रिटायर्ड होत असल्याचं घोषित केलं.  

त्याच्या सहकारी खेळाडूंना या निर्णयानं तेव्हा आश्चर्य वाटलं, पण नंतर स्कोअरबोर्डकडे पाहून कॅप्टनच्या निर्णयाचं कारण कळलं.  

त्यावेळी क्लबचा स्कोअर ४०८ रन्स जो की ऑस्ट्रेलियाचा ह्युजचा टेस्टचा नंबर होता आणि ६३ ओव्हर झाले होते. ह्युजने त्यावेळी ६३ रन्स केले होते जेव्हा तो जीवघेणा बॉल पडला. हाडनचे प्रवक्ते विंसेंट मॅकडोनाल्डनं सांगितलं की, नंतर आम्ही सर्वांनी शॉन मॅकआर्थरजवळ जावून त्याचं हस्तांदोलन केलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.