क्रिकेटर अमित मिश्राला अटक, जामीनावर सुटका

भारताचा क्रिकेटर अमित मिश्रा याला बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलाला मारहाण केल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. 

Updated: Oct 27, 2015, 07:25 PM IST
क्रिकेटर अमित मिश्राला अटक, जामीनावर सुटका title=

बंगळुरू : टीम इंडियाचा स्पिनर अमित मिश्राला एका महिलेला शिविगाळ, मारहाण आणि छेडछाड केल्याप्रकरणी बंगळुरु पोलिसांनी अटक केली होती. 

अटकेनंतर त्याला लगेचच जामीन मंजूर झाला. बंगळुरुत एका महिलेनं त्याच्याविरोधात काही दिवसांपूर्वी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर खरतर तिनं ही तक्रारही मागे घेतली होती. मात्र पोलिसांनी तीन तास चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली आणि त्यानंतर लगेचच त्याला जामिनही मंजूर झाला. 

दरम्यान आता अमित मिश्राप्रकरणी बीसीसीआय काय भूमिका घेते हे महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या सीरिजसाठी टीम इंडियामध्ये अमित मिश्राचा समावेश आहे.

एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात बंगळुरच्या अशोक नगर पोलीस ठाण्यात  तक्रार दाखल करण्यात आली होती. 

बंगळुर पोलिसांनी त्याच्याविरोधात समन्स बजावलं असून, सात दिवसांत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, अमित मिश्रा सध्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत खेळत होता. त्यामुळे त्याला चौकशीसाठी बोलविण्यात आले नव्हते. 

मिश्रा आणि तक्रारदार मुलीची चार ते पाच वर्षांपासून ओळख आहे आणि ते सातत्याने भेटतही होते. गेल्या महिन्यात मिश्रा येथे क्रिकेट कॅम्पसाठी आला तेव्हा ही मैत्रिण त्याला भेटायला येथील एका हॉटेलमध्ये गेली होती. ती त्याच्या रूममध्ये गेली तेव्हा तो उपस्थित नव्हता. तो परत आल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्याचवेळी मिश्राने आपला विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटलेय.

पोलिसांनी मिश्राला नोटीस बजावली होती. त्याला चौकशीसाठी पाचारण केले होते. तसेच हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचेही जबाब नोंदविले असून, हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेजही मिळविले आहेत. तसेच याबाबत बीसीसीआयला देखील माहिती देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

महिलेच्या तक्रारीवरून मिश्राविरुद्ध भांदविच्या ३५४ आणि ३२८ कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. 
 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.