क्रिकेटर इरफान पठानने गुपचप केले या मॉडेलशी लग्न

भारतीय क्रिकेटर आणि टीम इंडियातील फास्टर बॉलर  इरफान पठानने  दुबईत २१ वर्षीय मॉडेलशी गुपचप लग्न केल्याचे वृत्त हाती आले आहे. त्याबाबतचे फोटो व्हायरल झालेत. 

Updated: Feb 6, 2016, 10:51 AM IST
क्रिकेटर इरफान पठानने गुपचप केले या मॉडेलशी लग्न title=

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटर आणि टीम इंडियातील फास्टर बॉलर  इरफान पठानने  दुबईत २१ वर्षीय मॉडेलशी गुपचप लग्न केल्याचे वृत्त हाती आले आहे. त्याबाबतचे फोटो व्हायरल झालेत. 

मॉडेल सफा बेग हिच्याशी इरफान विवाह बंधनात अडकला आहे. रविवारी इरफान हा सौदी अरेबियातील जेद्दा शहरात गेला होता. त्यावेळी त्याच्यासोबत मोजकेच कुटुंबीय उपस्थित होते. जेद्दा येथे इरफानचा सफा बेग हिच्याशी निकाह झाला.

सफा बेग ही मॉडेलिंग करत आहे. मात्र, ती मूळची भारतीय आहे. सफा आणि इरफानची भेट दुबईत झाली. त्यावेळी लग्न करण्याचा दोघांनी विचार केला. त्यानंतर इरफानचे कुटुंबीय सफाला भेटण्यासाठी जेद्दाला गेले होते. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने लग्नाचे ठरले.