नवी दिल्ली: सात सामन्यातील चौथ्या पराभवानंतर दिल्लीचा कर्णधार जेपी डुमिनीने खराब फॉर्ममध्ये असलेल्या युवराज सिंगचा बचाव केला आहे. तसेच पुढील सामन्यात संघातील बदलाबाबत संकेतही दिले.
सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना डुमिनी बोलला की, आमची कामगिरी फार निराशाजनक आहे. फलंदाज आणि गोलंदाज सलग चांगलं प्रदर्शन करण्यात अपयशी होत आहेत. त्यामुळे पुढील मॅचमध्ये संघातील बदलावाबाबत विचार करावा लागेल. मात्र खेळाडूच्या निवडीवर बोलण्याचा मला अधिकार नाही. आयपीएलमधील सर्वात महाग खेळाडू युवराज सिंग चांगलं प्रदर्शन करू शकत नाहीये, याचा दबाव सर्व संघावर येत आहे. मात्र खराब प्रदर्शनाल युवराज सर्वस्वी जबाबदार नाही. तसेच संघात जहीर खानच्या वापसीचेहची संकेत डुमिनीने दिले.
रॉयल चॅलेन्जर्स बॅंगलुरूविरुद्धच्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सचा पराभव झाला. या सामन्यात दिल्लीला पहिली फलंदाजी करत केवळ 95 धाव करता आल्या होत्या. आरसीबीने हे आव्हान केवळ 10.3 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.